दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन हा ‘पुष्पा’ या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर आता प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा करत आहेत. हा चित्रपट आता कसा असेल असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना लागले आहेत. दरम्यान, या सगळ्यात आता अल्लू अर्जुनला ‘आयकॉन’ हा चित्रपट गमवावा लागला. कारण, पुष्पाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे या चित्रपटासाठी वेळ देणं त्याला शक्य नव्हतं.
पुष्पा चित्रपट सुपर हिट झाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी आता त्याचा दुसरा भाग आणण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्यावर चर्चा सुरु असताना अल्लू अर्जुन आता इतर प्रोजेक्ट्सकडे दुर्लेक्ष करत असल्याची माहिती समोर येत आहे. दुसऱ्या भागाचं शुटिंग झाल्यानंतर अल्लू इतर चित्रपटात काम करू शकेल. त्यामुळे अल्लू अजूननं ‘आयकॉन’ हा चित्रपट केला नाही आणि त्याच संपूर्ण लक्ष हे पुष्पा चित्रपटावर देणार आहे.
आणखी वाचा : “पहिल्यांदा किस करताना मला…”, गिरिजा ओकने सांगितला कॉलेजमधला ‘तो’ विचित्र अनुभव
आणखी वाचा : शिल्पा शेट्टीने भर स्टेजवर रोहित शेट्टीला मारली लाथ, Video Viral
अल्लू अर्जुनला या चित्रपटात काम करण्याची इच्छा असताना ‘पुष्पा २’ मुळे त्याला या चित्रपटाला नकार द्यावा लागला. त्याने नकार दिल्याने चित्रपटाचे दिग्दर्शक दुसऱ्या अभिनेत्याच्या शोधात आहेत. तर आता निर्मात्यांनी अभिनेता राम पोथिनेनीला चित्रपटाची ऑफर दिल्याचे म्हटले जातं आहे. आता राम पोथिनेनीने चित्रपटाला होकार दिला तर अल्लू अर्जुनच्या हातातून हा चित्रपट जाणार.