प्रभासचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या प्रोजेक्टपैकी एक मानला जात आहे. या चित्रपटाला ‘कल्की २८९८ एडी’ असे नाव देण्यात आले आहे. ‘कल्की २८९८ एडी’ हा प्रभासचा बहुप्रतिक्षित साय-फाय फॅन्टसी चित्रपट आहे. हा चित्रपट निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. ‘मोठमोठे स्टार्स या प्रोजेक्टशी जोडले गेले असल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. चित्रपटाशी संबंधित आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटामध्ये प्रभासबरोबरच दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘कल्की २८९८ एडी’ हा दीपिका पदुकोणचा तेलुगु भाषेतील पहिला चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, सुप्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली हे या चित्रपटात छोटी भूमिका साकारणार आहेत. आता यानंतर आणखी एका दिग्दर्शकाचा कॅमिओ आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा : ‘जवान’मधील डायलॉगची ‘आम आदमी पार्टी’ने केली केजरीवाल यांच्या भाषणाशी तुलना; ट्वीट होतंय व्हायरल

काही मीडिया रीपोर्टनुसार दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हेसुद्धा या चित्रपटात छोट्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. इतकंच नव्हे तर राम गोपाल वर्मा यांनी या बहुचर्चित चित्रपटातील भूमिकेचे चित्रीकरणही पूर्ण केले आहे. अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी प्रेक्षक आता या दोन्ही दिग्दर्शकांना अभिनय करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

गेली बरीच वर्षं राम गोपाल वर्मा हे चित्रपटसृष्टीपासून लांब आहेत. त्यांनी अगदी मोजकेच चित्रपट गेल्या काही वर्षात दिग्दर्शित केले आहेत. त्यामुळे आता या नव्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये राम गोपाल वर्मा यांना अभिनय करताना पाहणं ही चित्रपटरसिकांसाठी पर्वणीच असणार आहे. याबरोबरच या चित्रपटात कमल हासन हे नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. दाक्षिणात्य सिनेरसिक आणि एकूणच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After rajamouli ram gopal varam will do cameo in prabhas starrer kalki 2898 ad avn