रणवीर अलाहाबादिया(Ranveer Allahbadia) हा प्रसिद्ध युट्यूबर चर्चेत आला आहे. सामान्यत: रणवीर अलाहाबादिया हा त्याच्या पॉडकास्टसाठी ओळखला जातो. बीअर बायसेप्स (Beer Biceps) या त्याच्या पॉडकास्टमध्ये विविध विषयांवर तसेच अनेकविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तीबरोंबर तो चर्चा करताना दिसतो. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी त्याच्या युट्यूब चॅनेलवर हजेरी लावत मुलाखती दिल्या आहेत. आता मात्र हा युट्युबर त्याच्या पॉडकास्टमुळे नाही तर त्याने एका कार्यक्रमात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे मोठ्या चर्चेत आला आहे. त्याच्या टिप्पणीवरून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता त्याच्या युट्यूबवरील सबस्क्रायबर्स मोठ्या प्रमाणात संख्याही घटली असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिअर बायसेप्स’चे ‘इतके’ मिलियन सबस्क्रायबर्स झाले कमी

रणवीर अलाहाबादियाच्या बीअर बायसेप्स या युट्यूब चॅनेलचे ३१ जानेवारी २०२५ ला १०.५ मिलियन सबस्क्रायबर्स होते. तर १० फेब्रुवारीला हा आकडा ८. 3 मिलियन इतका झाला आहे. जवळजवळ दोन मिलियन लोकांनी त्याच्या चॅनेलचे अनसबस्क्राइब केले आहे. इंडिया गॉट लेटेंटमध्ये केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा रणवीर अलाहबादियाला चांगलाच फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

इंडिया गॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला प्रश्न विचारला की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल? रणवीरने हा प्रश्न विचारल्यानंतर समय रैनाने हे सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न असल्याचे म्हटले.

रणवीर अलाहाबादिया व समय रैनाची ही व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून देशभरातून यावर प्रतिक्रिया येत आहे. चाहत्यांसह अनेक नामांकित व्यक्तींनी युट्यूबरच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. अनेकांनी त्याच्या युटयूब चॅनेलवर बंदी घालण्याची मागणी केली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याची मागणीदेखील केली आहे. तर अनेकांनी त्याच्याकडून ही अपेक्षा नसल्याचे म्हटले आहे. रणवीर अलाहाबादियाने एक व्हिडीओ शेअर करीत त्याच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून रणवीर अलाहाबादियाचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनादेखील उधाण आले होते. निक्की शर्मा व रणवीरने एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याने या चर्चा होत होत्या. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल उघ़डपणे वक्तव्य केले नसले तरी त्यांनी शेअर केलेल्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते.