अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. रणवीरच्या न्यूड लूकला बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा देत त्याचं कौतुक केलं. सोशल मीडियावर तर रणवीरच्या या लूकची जोरदार चर्चा रंगली. यासाठी त्याला ट्रोलिंगचा बराच सामना करावा लागला. तर काहींनी त्याच्या लूकला पसंती देखील दर्शवली. आता रणवीर पाठोपाठ आणखी एका अभिनेत्याच्या न्यूड लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा – “पैसे खाल्ले की नाही…” संजय राऊतांवरील ईडी कारवाईवर आरोह वेलणकरचं ट्वीट चर्चेत
हिंदी ‘बिग बॉस १३’ या कार्यक्रमामुळे असमि रियाज (Asim Riaz) प्रकाशझोतात आला. असिमने न्यूड फोटोशूटचे काही फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. पण हे सगळे फोटो आणि व्हिडीओ २०१७मधील असल्याचं त्याने म्हटलं आहे. काही तासांमध्येच त्याचा हा लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. तसेच नेटकऱ्यांनी त्याच्या या फोटोंवर कमेंट करण्य़ास सुरुवात केली आहे.
या फोटोंमध्ये त्याची शरीरयष्टी पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. तसेच असिमचा हा लूक विशेष लक्षवेधी ठरला आहे. असिमने फोटो पोस्ट करताच “हे खूप अति झालं”, “रणवीर सिंगकडून प्रेरणा घेतलीस का?” अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहींनी त्याच्या या लूकचं भरभरून कौतुक केलं आहे.
असिम हा ‘बिग बॉस १३’मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. शेवटच्या स्पर्धकांमध्ये त्याचा सहभाग होता. मात्र, ‘बिग बॉस १३’ चा किताब सिद्धार्थ शुक्लाने पटकावला. विशेष म्हणजे ‘बिग बॉस’नंतरही असिमची लोकप्रिय कायम आहे. त्याने हिमांशी खुराना आणि जॅकलीन फर्नांडिससोबत म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे.