सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे बॉलिवूड स्टार रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटची. अनेकांनी रणवीरच्या या न्यूड फोटोशूटचं कौतुक केलंय. तर काही नेटकरी मात्र त्याला ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर तर रणवीरच्या मीम्सची नेटकरी मजा घेत आहेत. रणवीरचं न्यूड फोटोशूट चर्चेत असताना आता एका हॉलिवूड अभिनेत्रीनेदेखील न्यूड फोटोशूट केलंय. सोशल मीडियावर या अभिनेत्रीचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
रणवीर सिंगनंतर हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका जेनिफर लोपेजने सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर केलाय..जेनिफर लोपेजने २४ जुलैला तिचा ५३वा वाढदिवस साजरा केला. यावेळी जेनिफरने तिच्या इन्स्टास्टाग्राम अकाऊंटवर तिचा न्यूड फोटो आणि व्हिडीओ शेअर केला. जेनिफरच्या इन्स्टा्ग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ थंबनेल आहे. ज्यात तिचा न्यूड फोटो दिसतोय. मात्र व्हिडीओ प्ले केल्यास काळ्या रंगाच्या मोनोकनीमध्ये जेनिफरची अदाकारी पाहायला मिळतेय.
हे देखील वाचा: रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर स्वरा भास्करची प्रतिक्रिया, म्हणाली “आपल्या देशात…”
एकीकडे भारतात अभिनेता रणवीर सिंगला न्यूड फोटोशूटमुळे टीकेला सामोरं जावं लागतंय. तर जेनिफरने शेअर केलेल्या या न्यूड फोटोवर चाहते तिचं कौतुक करत आहेत “तू खरचं ५३ वर्षांची झालीस का?” असा प्रश्न तिचे चाहते विचारत आहेत. वयाच्या ५३व्या वर्षीदेखील जेनिफर अत्यंत सुंदर आणि तरुण दिसत असल्याचं तिचे चाहते म्हणत आहेत.
हे देखील वाचा: दाक्षिणात्य अभिनेत्याचं रणवीर सिंगच्या पावलावर पाऊल, केलं न्यूड फोटोशूट
जेनिफर लोपेजचं JLO Care हे स्वत:च स्किन ब्रण्ड आहे. या ब्रण्डच्या प्रमोशनसाठी जेनिफरने हा व्हिडीओ शेअर केला होता. तर रणवीर सिंगने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. रणवीरच्या फोटोशूटनंतर मात्र सगळीकडे एकच खळबळ माजली. अनेकांनी त्याला ट्रोल केलं असलं तरी बॉलिवूडमधील अनेकांनी त्याला पाठिंबा दिला आहे.