‘फॅण्ड्री’नंतर रुपेरी पडद्यावर दाखल झालेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ने लोकप्रियतेबरोबरच बॉक्स ऑफिसवरही ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे केली आहेत. शुक्रवार ते रविवार या पहिल्या तीन दिवसांत ‘सैराट’ने १२ कोटी १० लाखांचा गल्ला जमविला असून मराठीत तो एक नवा विक्रम आहे. यानंतर पहिल्यांदाच दिग्दर्शक नागराज मंजुळेने प्रतिक्रिया दिली आहे. नागराजने त्याच्या फेसबुकवरून एक पोस्ट अपलोड करत आपला आनंद व्यक्त केला आहे.
नागराजने पोस्टमध्ये म्हटलंय की, “कमाईचं रेकॉर्ड” हा आनंद तर आहेच मात्र शहरापासून गावखेड्यापर्यंत कधीही चित्रपट गृहात न येणारा माणूस सैराट बघतोय याचा आनंद जास्त आहे. चांगभलं !

Story img Loader