आपल्या आगामी ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटासाठी ‘एट पॅक्स अॅब्ज’ बनविल्याच्या चर्चेतून शाहरुख खानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असताना आता बॉलीवूड ‘सिंघम’ अजय देवगणही आपल्या ‘अॅक्शन जॅक्सन’ चित्रपटासाठी आपल्या शरीरयष्टीवर अधिक पीळदार करण्यासाठी भर देतोय. अजयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपल्या आगामी ‘अॅक्शन जॅक्शन’ चित्रपटासाठी शरिरयष्टीवर मेहनत घेऊन आकर्षक बनविण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे सोबत अॅक्शन अंदाजातील आपले छायाचित्रही शेअर केले आहे.
या छायाचित्रावर अजयने आपल्या चाहत्यांच्या प्रतिक्रियाही मागविल्या आहेत. अॅक्शन जॅक्शन या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवा करत असून सोनाक्षी सिन्हा आणि यामी गुप्ता या चित्रपटात अभिनेत्रीच्या भुमिकेत असणार आहेत. याआधी ऑनस्क्रीनवर सलमान, ऋतिक, आमिर,रणवीर यांनी आपल्या चाहत्यांना ‘सिक्स पॅक अॅब्ज’ची भुरळ घातली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा