बॉलिवूड स्टार शाहरूख खान, अमिर खान, सैफ अली खान, अक्षय कुमार आणि इतर अभिनेत्याच्या पाठोपाठ इमरान हाश्मीला चित्रपट निर्मितीक्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण करायचे आहे.
“येत्या दोन वर्षांमध्ये मी चित्रपट निर्मितीमध्ये उतरेल. चित्रपट निर्मिती म्हणजे मोठ्या जबाबदारीचे काम आहे. मी इतक्यात त्यासाठी तयार नाही. गेल्या २० वर्षांपासून बॉलिवूडची मोठी स्टार मंडळी या क्षेत्रामध्ये आहेत. त्यांचा अभिनयाबरोबरच चित्रपट क्षेत्राबद्दलचा अनुभव मोठा आहे.” असे इमरान म्हणाला.
“माला आधी एक कंपनी निर्माण करावी लागेल. त्याचबरोबर योग्य पटकथा आणि दिग्दर्शक निवडावा लागेल. या सर्व नियोजनासाठी वेळ लागणार आहे. मला असे वाटते, मी हे नियोजन करू शकतो. मात्र, मला माझ्या अभिनयाच्या कामातून थोडा वेळ मिळाल्यावर मी चित्रपट निर्मितीवर लक्षकेंद्रीत करू शकेल,” असे इमरान म्हणाला.
इमरानचे काका महेश आणि मुकेश भट यांची ‘विशेष फिल्मस’ही स्वत:ची चित्रपट निर्मिती संस्था असून, इमरानचे बॉलिवूडमध्ये याच बॅनरखाली आगमन केले होते.       

Story img Loader