स्वतःची दुखापत कामाच्या आड  येऊ न  देणा-या सेलिब्रेटींच्या यादीत शाहरूख खान आणि ईशा देओलच्या पाठोपाठ आता प्रियांका चोप्राचा समावेश झाला आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने ट्विटरवरून आपल्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे सांगितले होते. मात्र, नवी दिल्लीत ५ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ऑटो-एक्सपो प्रदर्शनाला हजेरी लावून आपल्या कामाच्या आड दुखापत येऊ शकत नाही, हे प्रियांकाने एकप्रकारे दाखवून दिले आहे. या प्रदर्शनात दुखापतीमुळे होणारा कोणताही त्रास चेह-यावर न दाखवता तेथे असणा-या कारसोबत प्रियांकाने छायाचित्रकारांना अनेक आकर्षक पोझेस दिल्या. यापूर्वी शाहरुख खानलासुद्धा फराह खान दिग्दर्शित ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या सेटवर दुखापतीला सामोरे जावे लागले होते. या दुखापतीतून सावरून आपण पुन्हा लवकरच कामाला लागणार असल्याचे शाहरूखने ट्विटरवर सांगितले होते. तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या अहाना देओलच्या लग्नात ईशा देओल ही सुद्धा आपली दुखापत बाजूला सारून सामील झाली होती.

Story img Loader