मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर बॉलिवूड चित्रपटांच्या विरोधात ‘बॉयकॉट’ ट्रेंड होत आहे. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटल्यानंतर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू होती. आता विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ चित्रपटालाही बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात येत आहे. याशिवाय विजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच ‘लायगर’च्या प्रमोशनदरम्यान, दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याला सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंडबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, “मला वाटते की चित्रपटाच्या सेटवर अभिनेता, दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांच्याशिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या व्यक्ती असतात. एका चित्रपटासाठी जवळपास २००-३०० कलाकार काम करतात आणि आमच्या सर्वांचे कर्मचारी सदस्य असतात, त्यामुळे चित्रपट अनेक लोकांना काम देतो. तो त्यांच्या उपजीविकेचे साधन असतो.
आणखी वाचा- गरोदर आलियाची खिल्ली उडवणाऱ्या रणबीरला नेटकऱ्यांनी सुनावलं; पाहा नेमकं काय घडलं

विजय देवरकोंडा पुढे म्हणाला, “आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ची निर्मिती करतो. तेव्हा तो २००० ते ३००० कुटुंबांना काम देतो. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेता तेव्हा त्याचा तोटा केवळ आमिर खानलाच होत नाही, तर काम आणि रोजीरोटी गमावणाऱ्या हजारो कुटुंबांवरही तुमच्यामुळे परिणाम होत असतो. आमिर खान हा असाच एक कलाकार आहे जो प्रेक्षकांना थिएटरमध्ये येण्यास भाग पाडतो. हा बहिष्कार का टाकला जात हे मला माहीत नाही, पण गैरसमज काहीही असले तरी तुमच्यामुळे आमिर खानवर नाही तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे हे लक्षात घ्या.”

आणखी वाचा- “आता पाणी डोक्यावरून जातंय…” ‘बॉयकॉट’ ट्रेंडवर विजय वर्माची संतप्त प्रतिक्रिया

विजयच्या या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. सोशल मीडियावर बॉयकॉट लायगर हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. याशिवाय करण जोहरमुळेही लोक ‘लायगर’वर बहिष्कार टाकत आहेत. करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’च्या बॅनरखाली ‘लायगर’ची निर्मिती करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After shahrukh khan and amir khan boycott trend agaisnt vijay deverakonda film liger mrj
Show comments