बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या लूक्स आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, या वेळी शिल्पा पती राज कुंद्रामुळे चर्चेत आली आहे. राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अॅप प्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर आता शिल्पाचा आगामी चित्रपट ‘हंगामा २’चं एक गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं पाहताच नेटकऱ्यांनी शिल्पाला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

‘हंगामा २’ मधील या गाण्याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या गाण्याचं नाव ‘हंगामा हो गया’ असं आहे. या गाण्यात शिल्पा बोल्ड अंदाजात दिसत आहे. या गाण्यात शिल्पासोबत प्रणिता सुभाष, मीझान आणि परेश रावल दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. त्यानंतर शिल्पा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘काल हंगामा कमी झाला का?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हंगामा तर झाला पण राज कुंद्रासाठी.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘पत्नी बनवते योगचे व्हिडीओ आणि पती बनवतो अश्लिल व्हिडीओ,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी शिल्पाला ट्रोल केलं आहे.

shilpa shetty, shilpa shetty trolled
सोशल मीडियावर कमेंट करत नेटकऱ्टांनी केले शिल्पाला ट्रोल…

 

‘हंगामा २’ मध्ये शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मीझान जाफरेसोबत प्रणिता सुभाषसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर आशुतोष राणा, मनोज जोशी, राजपाल यादव, जॉनी लीव्हर आणि टिकू तल्सानिया या चित्रपटात विनोदी रंगाची जोड देतील. हा चित्रपट २३ जुलैला हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होईल.