बॉलिवूडचा भाई जान सलमान खानचा आज ५६वा वाढदिवस आहे. तो त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पनवेलच्या त्याच्या फार्महाऊसवर गेला होता. त्यावेळी त्याला एका विषारी सापाने चावले होते. पण सलमान आता ठिक असून त्याने त्याच्या कुटुंबासोबत आणि त्याच्या काही जवळच्या मित्रांसोबत साजरा केला आहे. त्याच्या वाढदिवसाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सलमानच्या एका फॅनक्लबने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सलमान आणि त्याची भाची आयत केक कट करताना दिसत आहे. यात सलमान आणि आयतसोबत आयुष शर्मा दिसत आहे. मोठ्या जल्लोषाने सलमानने वाढदिवस साजरा केला आहे. सलमान आणि त्याची भाची आयतचा वाढदिवस हा २७ डिसेंबर रोजी असतो. दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये जेव्हा अर्पिताच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा सलमानने त्याच्यासाठी वाढदिवशी मिळालेलं हे सगळ्यात चांगल गिफ्ट होतं. तेव्हा पासून सलमान आणि आयत एकत्र वाढदिवस साजरा करतात.

आणखी वाचा : प्रियांकाला ‘या’ हॉलिवूड अभिनेत्यासोबत करायचेय लग्न

आणखी वाचा : “कोण अक्षय कुमार…”, लग्नाची भविष्यवाणी ऐकल्यावर ट्विंकल खन्ना पडली होती गोंधळात

सलमानच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये जिनिलिया देशमुख, रितेश देशमुख, बॉबी देओल, संगीता बिजलानी, सैफ अली खान, निखिल द्विवेदी, रजत शर्मा, वत्सल सेठ, अलवीरा खान, अतुल अग्निहोत्री उपस्थित होते. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर, सलमान या आधी सात तास रुग्णालयात होता.