अवघ्या काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केलेली पार्टी बॉलिवूडकरांना महागात पडली आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि मलायका अरोराची बहिण अमृता अरोरा यांना करोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ निर्माता सोहेल खानची पत्नी सीमा खान आणि अभिनेता संजय कपूर यांची पत्नी महिप कपूर यांनाही करोना झाला आहे. आता यानंतर सलमान खानचा पुतणा आणि सोहेल खानचा दहा वर्षीय मुलगा योहान खान यालाही करोनाची लागण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा खानला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता सोहेलचा मुलगा योहान खानला करोनाचा संसर्ग झाला आहे. योहानशिवाय सीमाच्या बहिणीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बॉलिवूडकरांना पार्टी करणे महागात पडल्याचे बोललं जात आहे.

नुकतंच सीमा खान राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे. या इमारतीत राहणाऱ्या सर्वांच्या कोव्हिड चाचण्या केल्या जाण्याची शक्यता आहे. यातील ज्या व्यक्तींच्या चाचणी पॉझिटिव्ह येतील ते मजले सील केले जाण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

करीना कपूरला करोना झाल्यानंतर करण जोहरचं ‘त्या’ पार्टीवर स्पष्टीकरण; म्हणाला “माझं घर हॉटस्पॉट…”

दरम्यान, करीना आणि अमृताच्या संपर्कात आलेल्या करिष्मा कपूर, मलायका अरोरा, अनिल कपूर यांची धाकटी लेक रिया यांना घरीच आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. पहिली पार्टी रिया हिच्या घरी झाली होती. ही पार्टी ख्रिसमस पार्टी होती. त्यानंतर या दोघींनी अनेक खासगी पार्ट्यांना हजेरी लावली होती. त्यातच ग्रँड हयात हॉटेलमधील पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी गर्दी केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सारा अली खान, तिचा भाऊ इब्राहिम अली खान, जान्हवी कपूर आणि सारा तेंडुलकरनेही हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After sohail khan wife seema khan his 10 year old son yohaan tests positive for covid 19 nrp