Lalit Modi Dating This Model : ललित मोदी यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि त्यामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत त्यांच्या नव्या गर्लफ्रेंडच्या. आयपीएलचे पहिले फाऊंड ललित मोदी यांनी सुश्मिता सेन बरोबरचा एक रोमान्स करणारा फोटो मागच्या वर्षी शेअर केला होता. या दोघांनी लग्न केल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र या दोघांचं ब्रेक-अप झालं. आता ललित मोदींचं नाव एका नव्या मॉडेलशी जोडलं गेलं आहे.
हरिश साळवेंच्या लग्नात ललित मोदींसह झळकली सुपरमॉडेल
वकील आणि भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांच्या तिसऱ्या लग्नात ललित मोदीही होते. यावेळी ललित मोदी एका मॉडेलसह आले आणि सुरु झाली त्यांच्या नव्या अफेअरची चर्चा. ललित मोदी हे आता मराठमोळी मॉडेल आणि अभिनेत्री उज्वला राऊतला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कारण हरिश साळवेंच्या लग्नात या दोघांची उपस्थिती होती.
कोण आहे उज्वला राऊत?
उज्वला राऊतचा जन्म १९७८ मध्ये झाला. ९० च्या दशकातली सुपरमॉडेल म्हणून उज्वला राऊत ओळखली जाते. तिचे वडील मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त होते. उज्वलाने वयाच्या १७ व्या वर्षीच फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी तिने फेमिना लुक ऑफ द इयरचा किताबही जिंकला होता. त्यानंतर १९९६ मध्येच फ्रान्सच्या एलिट मॉडेल लुक स्पर्धेतही ती होती. त्या स्पर्धेत पहिल्या पंधरा मॉडेल्समध्ये तिचा समावेश होता.

व्हिक्टोरिया सिक्रेटच्या फॅशन शोमध्ये रँप वॉक करणारी ती पहिली भारतीय ठरली होती. २००२ आणि २००३ या सलग दोन वर्षांमध्ये तिने या शोसाठी रॅम्प वॉक केला होता. एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द इयर या सोमध्ये ती परीक्षक म्हणूनही आली होती. यामध्ये तिच्याबरोबर मिलिंद सोमणही होता. ह्युगो, डॉल्से, गुची, ऑस्कर दे ला रेंटा या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रांडसाठी तिने रॅम्प वॉक केलं आहे. उज्वलाने २००४ मध्ये स्कॉटलँडचा फिल्म मेकर मॅक्सवेल स्टेअरीशी लग्न केलं. मात्र २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता ती ललित मोदींसह दिसल्याने या दोघांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या आहेत. TOI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
आयपीएलचे फाऊंडर ललित मोदी हे सुश्मिता सेन यांच्यात प्रेमाचा अध्याय सुरू झाल्याच्या बातम्या जितक्या वेगाने आल्या तितक्याच वेगाने त्यांच्या ब्रेक अपचीही बातमी आली. ललित मोदींनी सुश्मिता सोबतचे खास फोटो पोस्ट केले होते. सुश्मितासाठी ललित मोदी यांनी betterhalf असा उल्लेख केला होता. त्यावेळी दोघांनी एकमेकांना डेट करत आहोत अशीही कबुली दिली होती. मात्र ते नातं संपुष्टात आलं. त्यानंतर आता ललित मोदी हे उज्वला राऊतला डेट करत असल्याची चर्चा आहे.