बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर शिल्पा सोशल नेटवर्किंग साइट्सवर टॉप ट्रेंड करत आहे. ट्विटरवर तर नेटकरी राज कुंद्राला एटक केल्यानंतर शिल्पा शेट्टीला ट्रोल करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्वीट करत अनेकांनी राज आणि शिल्पाला ट्रोल केले आहे. एका नेटकरी म्हणाला, ‘राज कुद्रां बोलतो – नाही मी निर्दोष आहे. तर शिल्पासाठी त्याने बागबान या चित्रपटातील ‘आपतो झुट भी नही बोल पाते’ हा डायलॉग शेअर केला आहे. दुसरा नेटकरी बोलतो, ‘बिचारी पत्नी शिल्पा शेट्टी योगामध्ये व्यस्त होती आणि पती राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवत राहिला! राजसाहेब काही दिवस तुरूंगात घालवतील!’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘स्वतः बॉलिवूड त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे कारण देते, आपल्याला यावर ट्रेंड सुरू करण्याची गरज नाही. राज कुंद्राने पोर्नहबबरोबर करार केला असावा. शिल्पा शेट्टी – ये तो सुपर से भी उपर निकला.’

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा : मीरा कपूरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the arrest of raj kundra now shilpa shetty is trending on twitter dcp