‘प्रत्येक व्यक्तीकडे सांगण्यासारखी एक अनोखी गोष्ट असते आणि जर तुम्हाला जगात काही बदल करायचे असल्यास सर्वात पहिले तुम्ही तुमची गोष्ट बदलायला हवी’, असा एक महत्त्वपूर्ण संदेश ‘अहिल्या’ या चित्रपटाच्या निमित्ताने अधोरेखित केला जाणार आहे. ‘रेड बल्ब स्टुडिओज’ प्रस्तुत ‘अहिल्या’ या चित्रपटात ‘अहिल्या पाटील’चा एक कॉन्सटेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्रीधर चारी निर्मित आणि राजू पार्सेकर दिग्दर्शित-लिखित या चित्रपटात कर्तबगार आणि डॅशिंग महिला पोलीस ‘अहिल्या पाटील’ हे पात्रं अभिनेत्री प्रीतम कागणे हिने साकारले आहे. प्रीतमसह या चित्रपटात प्रिया बेर्डे, रोहित सावंत, अमोल कागणे, प्रमोद पवार, निशा परुळेकर आणि नूतन जयंत यांच्याही भूमिका आहेत.

मेहनतीने आणि आत्मविश्वासाने आयपीएस पोलीस अधिकारी झालेल्या महत्त्वांकाक्षी ‘अहिल्या’ची अभिमानास्पद गोष्ट लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायाला मिळणार आहे.