सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या भव्य ऐतिहासिक मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेत राणी अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र उलगडून दाखविले आहे आणि आपल्या सुजाण कारभाराने त्यांनी आपल्या राज्यात शांती आणि समृद्धी कशी प्रस्थापित केली. माणूस जन्माने नाही तर कर्तृत्त्वाने कसा मोठा असतो हे दाखवले आहे. आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या भक्कम पाठिंब्याने अहिल्याबाईंनी समाजातील अनिष्ट रूढींना आव्हान दिले आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी असामान्य योगदान दिले. त्यांनी केवळ इतिहास घडवला नाही, तर अनेक भावी पिढ्यांसाठी त्या प्रेरणामूर्ती बनल्या. एतशा संझगिरी, राजेश शृंगारपुरे आणि गौरव अमलानी अभिनीत ही मालिका ८ वर्षांची झेप घेणार आहे. संस्कारांचे सिंचन करणार्या मातेपासून ते जीवनदात्री मातोश्री बनण्यापर्यंतचा हा प्रवास असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा