अश्लीलता आणि बिभत्सतेच्या कारणावरून वादग्रस्त ठरलेल्या ‘एआयबी नॉक आऊट’ या वादग्रस्त कार्यक्रमाविरोधात गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने गुरूवारी कडक कारवाईचे आदेश दिले . न्यायालयाने या वादाची दखल घेत मुंबई पोलीसांना कार्यक्रमात सहभागी झालेल्या रणवीर सिंगसह १४ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आभा सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीच्यावेळी न्यायालयाने हा निर्णय सुनावला. त्यामुळे आता बॉलिवूड सेलिब्रिटी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या कार्यक्रमात अतिशय अश्लिल आणि कमरेखालचे विनोद असून महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत घरात हा कार्यक्रम पाहिलाच जाऊ शकत नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘एआयबी नॉकआऊट’ कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक होत हा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकीही दिली होती. दरम्यानच्या काळात या कार्यक्रमावरून प्रचंड वादंग माजला होता. 

Story img Loader