संजय लीला भन्सालीच्या ‘राम लीला’ चित्रपटाने सर्वांचे लक्ष्य वेधून असलेल्या रणवीरला काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, तरीही त्याच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा न झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
यश राज फिल्म्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीरची प्रकृती स्थिर असून, शरीरातील प्लेटलेट्सच्या संख्येत वाढ होत नसल्याने त्याला देखरेखीत ठेवण्यात आले आहे. तसेच, डॉक्टरांनी रणवीरला कोणालाही भेटण्यास सक्त मनाई केली आहे. अली अब्बास झफरच्या ‘गुंडे’ चित्रपटाची दुर्गापूर येथे शूटींग चालू असताना रणवीरला ताप येऊ लागला. पण चित्रिकरणात दिरंगाई होऊ नये म्हणून त्यांने तब्येतीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आता मुंबईत आल्यावर लगेचच तो २७ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल झाला तेव्हा त्याला डेंग्यू झाल्याचे कळले.
रणवीर रुग्णालयात असल्याने ‘राम लीला’चे प्रमोशनही रखडले आहे.

Story img Loader