बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने जेव्हा लग्न केले तेव्हा पासूनच ती बॉलिवूड पार्टींमध्ये कमीच दिसत होती. आता तर मुलगी आदिरा चोप्राच्या जन्मानंतर तर राणी मुखर्जी दिसलीच नाही. सोमवारी राणीला मुंबई विमानतळावर पाहण्यात आले. राणीशिवाय शाहिद कपूर, पत्नी मीरा राजपूत आणि मुलगी मिशा कपूर यांच्यासोबत मुंबई विमानतळावर पाहण्यात आले होते.

यावेळी विमानतळावर राणी एका वेगळाच अंदाजात दिसण्यात आली होती. राणीने काळ्या रंगाच्या ड्रेसवर करड्या रंगाचे जॅकेट घातले होते. तिच्या या लूकमध्ये एक वेगळेपण होते ते म्हणजे तिने घातलेले पेंडंट. राणीने तिच्या मुलीच्या नावाचे म्हणजे अदिराचे पेंडंट घातले आहे.

मागच्या वर्षी राणी मुखर्जी आणि तिचा पती आदित्य चोप्राच्या आयुष्यात आदिरा म्हणजेच त्यांच्या चिमुकलीचे आगमन झाले. तेव्हापासून सहसा राणी स्वत:सुद्धा प्रसारमाध्यमांसमोर कमीच आली. पण तिने आदिरालासुद्धा छायाचित्रकार आणि प्रसारमाध्यमांपासून दूरच ठेवले. राणीने नुकत्याच शेअर केलेल्या तिच्या मुलीच्या फोटोसोबत तिने लिहिलेले पत्र तिच्या मातृत्त्वावरही भाष्य करत होते. ‘मी आता खुपच शांत, सहनशील आणि इतरांच्या चुका समजून घेणारी बनले आहे. हे सर्व एका क्षणामध्येच झाले.’

‘माझ्यामध्ये झालेला बदल मी सुद्धा ओळखला. हा बदल कोणा एका चांगल्या कारणासाठीच असावा असं मला वाटतं. मी अशी आशा करते की आदिरालासुद्धा मी चांगले वाढवू शकेन, चांगले संस्कार देऊ शकेन. सर्वांना तिचा गर्व वाटावा असंच मला वाटत आहे. तर कोणालाही तिचा गर्व वाटला नाही तरीही मला नेहमीच तिचा गर्व वाटत राहिल’, असे राणीने या पत्रात लिहिले होते.

Story img Loader