कान चित्रपट महोत्सवातील उपस्थितीनंतर आता ऐश्वर्या राय-बच्चन पुढील महिन्यात लंडन येथे होणा-या विशाल संगीत समारंभात आंतरराष्ट्रीय संगीतकार मॅडोना आणि बेयोस यांच्याबरोबर भाग घेणार आहे. यावेळी अभिषेक बच्चनदेखील तिच्याबरोबर असणार आहे. १ जून रोजी होणा-या ‘चाइम फॉर चेंज’ समारंभाची ऐश्वर्या सूत्रसंचालक असेल. हा कार्येक्रम जगभरातील महिलांमध्ये अधिकार आणि सशक्तीकरणाबाबत जागरूकता वाढविण्याच्या सामाजिक कार्यासाठी मदतनिधी उभारण्यासाठी आयोजित केला जातो.
गायिका आणि चाइम फॉर चेंजची सह-संस्थापक आणि या कार्येक्रमाची संचालक बेयोस म्हणाली, एव्हढ्या मोठ्या संख्येने  कलाकार आणि सूत्रसंचालक ‘चाइम फॉरला चेंज’ ला सहयोग देण्यासाठी एकत्र आले आहेत हे पाहून मला खूप आनंद झाला. हा कार्येक्रम चांगल्या प्रकारे करून जगभरातल्या महिला आणि मुलींच्या आवाजाला एकजूट करून  मजबूती देणे हे आमचे लक्ष आहे.
या संगीत कार्यक्रमाचे तिकीट खरेदी करणा-या प्रत्येक व्यक्तिला त्याने खरेदी केलेल्या तिकिटाची रक्कम चाइम फॉर चेंजच्या विविध योजनांमधील कोणत्या योजनेला मिळावी याची निवडीचा अधिकार असणार आहे.
मॅडोना म्हणाली, जगभरात शाळेत न जाणा-या मुलींची संख्या ६० टक्के आहे. जगभरातील निरक्षर जनसंख्येच्या दोन तृतीयांश निरक्षर या महिला आहेत. महिलांची ही स्थिती चांगली नसून, यात बदल आणणे जरूरीचे आहे आणि आम्ही नक्कीच बदल घडवून आणू.

Story img Loader