सध्या इंटरनेटवर ‘कच्चा बादाम’ हे बंगाली गाणे धुमाकूळ घालत आहे. इंस्टाग्राम उघडताच आपल्याला याचा प्रत्यय नक्कीच येईल. या गाण्यावर अनेक रील्स बनत असून सेलिब्रिटीजनाही या गाण्याने भुरळ घातली आहे. इंस्टाग्रामपासून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक लोक या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ पोस्ट करत आहेत. दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सध्या कच्चा बदाम हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंडिंग असल्याचे दिसत आहे. अनेक कलाकार या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अशातच ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे.
Video: अल्लू अर्जुनच्या ५ वर्षांच्या मुलीने केला ‘कच्चा बादाम’ गाण्यावर डान्स

सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असणारे ‘कच्चा बादाम’ हे गाणं गाणारा व्यक्ती कोणताही प्रख्यात गायक नसून रस्त्यावर शेंगदाणे विकणारा सामान्य माणूस आहे. यांचे नाव भुबन बड्याकर असे आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूमी जिल्ह्यात भुबन हातगाडी घेऊन ठिक-ठिकाणी जाऊन शेंगदाणे विकतात. त्याचवेळी कोणीतरी, भुबन यांचा अनोख्या शैलीत गातानाचा व्हिडीओ शूट केला. इंटरनेटवर हा व्हिडीओ अपलोड होताच हे गाणे प्रचंड व्हायरल झाले. यानंतर लोकांनी या गाण्यावर डान्स व्हिडिओ बनवून भुबनला रातोरात प्रसिद्ध केले. त्यांचे या गाण्याने आयुष्यच बदलून टाकले.