मी अभिनेता आहे किंवा मेगास्टार अमिताभ बच्चनचा मुलगा असल्यामुळे ऐश्वर्याने माझ्याशी लग्न केलेलं नाही, असे म्हणणे आहे अभिषेक बच्चनचे. ‘कॉफी विथ करण या रिअॅलिटी ‘चॅट शोमध्ये अभिषेक पाहुणा म्हणून आला होता.
करणने नेहमीप्रमाणे त्याच्या प्रश्नांचा मारा अभिषेकवर केला. `जगातल्या सुंदर चेहऱ्याशी… अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याशी विवाह झाल्यानंतर तुला असुरक्षितता जाणवते का?` असा प्रश्न करणने अभिषेकला केला. त्यावर, ती जगासाठी आणि माझ्यासाठी सर्वात सुंदर गोष्ट आहे. मी स्वतःला रोज आरशात पाहतो. तिच्याशी माझी तुलना होऊ शकत नाही आणि मी करूही शकणार नाही. आम्ही एकत्र असण्याचं कारण हे आमचं दिसण तर अजिबातच नाही, असे अभिषेकने उत्तर दिले.
स्वतःचे पाय जमिनीवर असणा-यांपैकी ऐश्वर्या आहे. सामान्य माणस तिला केव्हाही भेटू शकतात. मी एक अभिनेता किंवा मी बच्चन आहे म्हणून तिने माझ्याशी लग्न केलेलं नाही. ती सर्वात सुंदरी स्त्री आहे किंवा प्रसिद्ध अभिनेत्री आहे यामुळे मीही तिच्याशी लग्न केलेलं नाही, असे अभिषेक म्हणाला.
२००७ साली ऐश्वर्या आणि अभिषेकने विवाह केला. त्यांना आराध्या ही मुलगी आहे.

Story img Loader