विश्व सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतेच ऐश्वर्या आणि अभिषेकचे आराध्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

त्यांचे हे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केले आहेत. हे फोटो मुंबई विमानतळावरील आहेत. ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्य हे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पॅरिसला निघाले आहेत. या फोटोमध्ये अभिषेकने राखाडी रंगाचा ट्रॅकसुट परिधान केला आहे. ऐश्वर्याने काळ्या रंगाची जीन्श आणि स्वेटशर्ट परिधान केले आहे. तर आराध्याने गुलाबी रंगाचे स्वेटशर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

जवळपास दोन वर्षानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक आराध्यासोबत इंटरनॅशनल ट्रीपला गेले आहेत. एका वृतवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी गेली आहे. तिथे ऐश्वर्या लॉरियल ब्रँडचे प्रतिनिधित्व करणार आहे. दरम्यान, लवकरच आराध्या दाक्षिणात्य चित्रपट पोन्नीयन सेल्वान या चित्रपटात दिसणार आहे. तर अभिषेक दशवींचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

Story img Loader