बॉलिवूडमधील अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन या जोडप्याची लोकप्रियता अद्यापही कायम आहे. फिल्मी पार्टी, समारंभ, जाहीर कार्यक्रम, स्टेज शो द्वारा ते नेहमीच चर्चेत असतात. या दोघांना एकत्र काम करताना पाहणे त्यांच्या चाहत्यानाही आवडते. मात्र या जोडप्यात आता ‘सामना’ रंगणार असून दोघे लवकरच एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. अर्थात त्यांचे हे ‘आमने सामने’ रुपेरी पडद्यावरील असून दोघांच्या प्रमुख भूमिका असलेले दोन वेगवेगळे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.
ऐश्वर्या पुन्हा रुपेरी पडद्यावर कधी पदार्पण करतेय, याची तिच्या चाहत्यानाही उत्सुकता होती. रुपेरी पडद्यापासून दूर गेलेली ऐश्वर्या ‘जज्या’ या आगामी चित्रपटातून ‘कमबॅक’ करणार आहे. तसेच करण जोहरच्या ‘ये दिल है मुश्किल’ या चित्रपटातही ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर, अनुष्का शर्मा हे कलाकार असून हा चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.अभिषेक बच्चन याचा ‘हाऊसफुल्ल’ हा नवा चित्रपटही आता अंतिम टप्प्यात असून हा चित्रपटही ३ जून रोजीच प्रदर्शित होणार आहे.
साजिद फरहाद दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेकसह अक्षयकुमार, रितेश देशमुख हे कलाकार आहेत.अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांचेही नवे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने रुपेरी पडद्यावर या दोघांचा सामना रंगणार आहे. दोघांचेही चाहते आणि सर्वसामान्य प्रेक्षक यांचा दोन्ही चित्रपटांना प्रतिसाद कसा देतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा