संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया हा गेली काही वर्षे बॉलीवूडपासून दुरावला आहे. पण, १९८३ साली शेखर कपूर दिग्दर्शित नसिरुद्दीन आणि शबाना आझमी यांची भूमिका असलेला ‘मासूम’ चित्रपटाचा रिमेक करण्यासाठीचे अधिकार हिमेशने विकत घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पती-पत्नीमधील पतीच्या आयुष्यातील सावत्र मुलावर आधारित असलेल्या ‘मासूम’ चित्रपटाच्या कथेने त्यावेळी प्रेक्षकांची मने हळवी झाली होती. आता तब्बल ३० वर्षानंतर हिमेश रेशमियाने चित्रपटाच्या रिमेकसाठी मूळ निर्माता चंदा दत्त आणि देवी दत्त यांच्याकडून चित्रपटाचे अधिकार विकत घेतल्याचे समजते. तसेच, नसिरुद्दीन आणि शबाना यांच्या भूमिका ऐश्वर्या आणि अभिषेक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘मासूम’च्या रिमेकचे दिग्दर्शन बेदोब्रता पेन करण्याची शक्यता आहे.

Story img Loader