अभिनयाच्या जोरावर आणि सौदर्याने केवळ देशातच नव्हे तर जगभरातील चाहत्यांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. २००९मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले. लग्नानंतर ऐश्वर्या फारशी सक्रिय नसली तरी ती एक काळ असा होता की चाहत्यांशी संवाद साधण्याची संधी सोडत नव्हती. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा जुना एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या अभिषेकला इंटरव्ह्यूमध्ये किस करण्यास सांगते.
ऐश्वर्या आणि अभिषेकने ओपरा विनफ्रे यांच्या लोकप्रिक शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी ऐश्वर्याने तिच्या करिअरशी संबंधीत आणि खासगी आयुष्यावर वक्तव्य केले. तर अभिषेकने ऐश्वर्याला कसे प्रपोज केले हे सांगितले आहे. दरम्यान ओपरा यांनी ऐश्वर्याला कॅमेरा समोर किसिंग सीन का नाही दिला? तुझे करिअरमध्ये खूप चांगले सुरु असतानाही असा प्रश्न विचारला. त्यावर ऐश्वर्याने ज्या प्रकारे उत्तर दिले ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.
आणखी वाचा : ‘सत्यमेव जयते 2’मधील नवे गाणे प्रदर्शित, नोरा फतेहीचा बोल्ड अंदाज
ओपरा यांचा प्रश्न ऐकून ऐश्वर्याला हसू आले. तिने अभिषेककडे पाहिले आणि इशारा करत भर इंटरव्ह्यूमध्ये किस करण्यास सांगितले. अभिषेकने ऐश्वर्याच्या गालावर किस केले. त्यांचा हा जुना व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.