हॉलिवूड बझ ने २०१४ या वर्षासाठी जाहीर केलेल्या जगातील ३० सर्वाधिक सुंदर स्त्रीयांच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि दीपिका पदुकोणचा समावेश करण्यात आलेला आहे. आराध्याच्या जन्मानंतर यमी मम्मी ऐश्वर्या गेले तीन वर्षे रुपेरी पडद्यापासून दुरावली आहे. मात्र, गेल्यावर्षी ती कान चित्रपट महोत्सवात उपस्थित राहिल्याने त्यासाठी तिला ‘कान’ कडून पैसे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीच्या पाठोपाठ ३० सौदर्यवतींच्या यादीत चौथ्या स्थानावर ऐश्वर्याची वर्णी लागली आहे. त्यामुळे माजी सौदर्यवतीचा किताब मिरवणा-या ऐश्वर्याने अद्याप आपल्या सौदर्याची जादू कायम असल्याचे दाखवून दिले आहे. याचबरोबर मागील वर्षात चार हिट चित्रपट नावावर असलेल्या दीपिका पदुकोणच्या नावाचा सुद्धा या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत दीपिकाला २९व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. तर, इटालियन अभिनेत्री मोनिका बेलुसी हिची २०१४ या वर्षासाठी जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून निवड झाली आहे. या यादीमध्ये जगभरातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश करण्यात आला आहे. जगातील सर्वात सुंदर महिलांची यादी खालीलप्रमाणेः
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा