पनामा पेपर्स लीक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावण्यात आले आहे. याप्रकरणी तिला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान, नुकतंच ऐश्वर्या चौकशीसाठी ईडीच्या दिल्ली कार्यालयात पोहोचली आहे. याच प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने अभिषेक बच्चनलाही समन्स बजावले होते.
याप्रकरणी ऐश्वर्या राय बच्चनला दोनदा फोन करण्यात आला होता. मात्र त्या दोन्ही वेळेला तिने नोटीस पुढे ढकलण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीकची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर तिने ही विनंती केली होती. तिची ही विनंती त्यावेळी मान्य करण्यात आली होती.
आणखी वाचा : ऐश्वर्या राय बच्चन ईडीच्या रडारावर, चौकशीसाठी बजावले समन्स
मात्र त्यानंतर ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायद्यातंर्गत ऐश्वर्याला समन्स बजावले आहे. हे समन्स गेल्या ९ नोव्हेंबरला बच्चन कुटुंबियांच्या प्रतिक्षा या निवासस्थानी पाठवण्यात आले होते. यावर पुढील १५ दिवसात उत्तर द्यावे, असेही नमूद करण्यात आले होते. ऐश्वर्याने ईडीला ईमेलद्वारे उत्तर दिले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या चौकशी कमिटीमध्ये ईडी, आयकर आणि इतर एजन्सींचा समावेश आहे.