‘पोन्नियिन सेल्वन १’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन २’ यासह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारा तमिळ स्टार जयम रवी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐशवर्या राय बच्चनचा को-स्टार जयम रवी आणि त्याच्या पत्नीच्या नात्यात दुरावा आला असून घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. जयम रवीच्या पत्नीने त्याच्यासोबतचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून हटवल्यानंतर या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, आत्तापर्यंत जयम रवी किंवा त्यांच्या पत्नीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयम रवी आणि आरती यांचे लग्न १५ वर्षांपूर्वी झालं आहे. ते दोघेही त्यांचे वैयक्तिक आयुष्य खूप खासगी ठेवतात. ते दोघे काही वेळा सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करायचे, पण आता आरतीने फोटो हटवल्याने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. आरतीने नुकतीच पती जयम रवीच्या पदार्पणाच्या चित्रपटाबद्दल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, त्यावरून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही ठिक आहे असं दिसत होतं. पण आता आरतीने पुन्हा एकदा फोटो हटवल्याने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल नाना पाटेकरांची मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या गोष्टीचा…”

आरतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून जयम रवीसोबतचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. पण तिच्या इन्स्टा बायोमध्ये ती जयम रवीची पत्नी आहे, असं तिने लिहिलं आहे. दुसरीकडे जयम रवीच्या अकाउंटवरील सर्व फोटो तसेच आहेत, फक्त आरतीनेच फोटो हटवले आहेत त्यामुळे तिने ते फोटो का डिलीट केले, याबद्दल चर्चा होत आहेत. आरतीला तिच्या कुटुंबाला इन्स्टाग्रामपासून दूर ठेवायचं आहे, त्यामुळे तिने फोटो हटवल्याचं म्हटलं जात आहे.

“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…

जयम रवी आणि आरती यांनी अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर २००९ मध्ये लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुलं आहेत. जयम रवीने आतापर्यंत ‘पेरणमाई’, ‘एम कुमारन सन ऑफ महालक्ष्मी’, ‘दीपावली’ आणि ‘थानी ओरुरवन’ यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’च्या दोन्ही भागात त्याने मुख्य भूमिका केली. तो शेवटचा ॲक्शन ड्रामा ‘सायरन’मध्ये दिसला होता. लवकरच त्याचे ‘बोर्थर’, ‘जिनी’ आणि ‘काधलिक्का नेरमिलाई’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.