बॉलिवूडच्या इतर स्टारकिड्सप्रमाणे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आराध्याला तिची आई ऐश्वर्याप्रमाणेच नृत्याची आवड आहे. त्यामुळे अनेकदा आराध्याचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. सध्या आराध्या आणि ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये या दोघीही प्रियांका चोप्राच्या लोकप्रिय गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहेत.
आराध्या बच्चन आणि ऐश्वर्याचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात आराध्या तिची आई ऐश्वर्या आणि बाबा अभिषेक यांच्यासोबत प्रियांका चोप्राच्या ‘देसी गर्ल’ या गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहे. या गाण्यावर ती प्रियांका चोप्राच्या डान्स स्टेपची हुबेहूब नक्कल करताना दिसत आहे.
आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा हा व्हिडीओ २०२१ मधील असून सध्या सोशल मीडियावर आराध्याच्या धम्माल डान्सची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हा व्हिडीओ त्यांच्या एका फॅमिली फंक्शनमधील आहे. ऐश्वर्याची चुलत बहीण श्लोका शेट्टीच्या संगीत समारंभात ऐश्वर्या, आराध्या आणि अभिषेक यांनी हा धम्माल डान्स परफॉर्मन्स दिला होता.
दरम्यान आराध्या बच्चनचा डान्स व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे बरेच डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. याशिवाय तिच्या शाळेतील फंक्शनमध्येही तिने केलेल्या डान्सचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.