बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आजवर आपल्याला चित्रपटांत किंवा पुरस्कार सोहळ्यात देखील लांबसडक केसांच्या लूकमध्ये दिसली आहे. परंतु, एका जाहिरातीसाठी ऐश्वर्याने आपले केस कापले असून या जाहिरातीत ऐश्वर्याचा नवा लूक पाहायला मिळणार आहे.
‘लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर-5’ या उत्पादनाच्या आगामी जाहिरातीत ऐश्वर्याचा हा नवा लूक पाहता येणार आहे. ‘लॉरियल’ या कंपनीची गेल्या दशकभरापासून ऐश्वर्या ब्रँड अम्बॅसिडर राहिली आहे. या कंपनीच्या येणाऱया नव्या जाहिरातीसाठी ऐश्वर्याने आपले केस कापले असून तिने आपल्या केसांना नवे रुप दिले आहे. ‘लॉरियल’ची ही जाहिरात टेलिव्हिजनवर 3 जानेवारीपासून दाखविली जाणार आहे.

Story img Loader