माजी मिस इंडिया, मिस वर्ल्ड राहिलेल्या ऐश्वर्या राय बच्चनने आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेमधून बिकीनी राऊंड हटवला गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. १९९४ मध्ये आपण जेव्हा ‘मिस वर्ल्ड’च्या किताब आपल्या पटकावला होता तेव्हा आपलं शरीर बिकिनी घालण्यासाठी योग्य नव्हतं, असे ऐश्वर्याने म्हटले आहे
बिकिनी राउंडचा या स्पर्धेत भाग घेणा-या महिलांना फायदा आहे ना आयोजकांना, असे म्हणत मिस वर्ल्ड स्पर्धेच्या अध्यक्ष ज्युलिया मोर्ले यांनी डिसेंबर २०१४ला बिकिनी राउंड हटविण्याची घोषणा केली होती. सदर निर्णयाने आपल्याला खूप आनंद झाल्याचे ऐश्वर्याने म्हटले. ‘मला जेव्हा मिस वर्ल्ड म्हणून निवडण्यात आले होते तेव्हा ८७ स्पर्धकांमध्ये माझे शरीर बिकिनी परिधान करण्यासाठी योग्य नव्हते. मी असं दाव्यासहीत म्हणू शकते आणि तरीही मी हा किताब जिंकला’, असे नुकतेच सगळ्यात यशस्वी मिस वर्ल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ऐश्वर्याने म्हटले आहे.
‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत बिकिनी राऊंड हटविल्याने ऐश्वर्या आनंदी
माजी मिस इंडिया, मिस वर्ल्ड राहिलेल्या ऐश्वर्या राय बच्चनने आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेमधून बिकीनी राऊंड हटवला गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
First published on: 10-01-2015 at 11:40 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan happy at dropping the bikini at miss world