बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कोणत्या कारणांमुळे चर्चेत येऊ शकते काही सांगता येत नाही. कधी व्यावसायिक कारणांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळेही तिच्या नावाची चर्चा होतच असते. आता तुम्हाला वाटत असेल की बच्चन कुटुंबियांशी निगडीत नवीन गोष्ट असेल पण तसे नाहीये. यावेळी ऐश्वर्याचं नाव एका वेगळ्याच प्रकरणात गुंतलं गेलं आहे. आंध्रप्रदेशमधील २९ वर्षीय मुलाने ऐश्वर्या राय त्याची आई असल्याचा दावा केला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या वृत्तानुसार, विशाखापट्टनम येथे राहणाऱ्या संगीत कुमारने ऐश्वर्या त्याची आई असल्याचे म्हटले आहे. आयईएफमार्फत १९८८ मध्ये लंडनमध्ये त्याचा जन्म झाला. त्यानंतर पुढील दोन वर्ष ऐश्वर्याचे पालक वृंदा राय आणि कृष्णाराज राय यांनीच त्याचे पालन- पोषण केले. यानंतर संगीतचे वडील आदिवेलू रेड्डी यांनी त्याला विशाखापट्टनम येथे आणले. यानंतर तो रेड्डी कुटुंबियांसोबतच राहतो.
संगीत म्हणाला की, ‘माझ्या आईने २००७ मध्ये अभिषेकशी लग्न केले. सध्या ती वेगळी राहत आहे, त्यामुळे तिने माझ्यासोबत मंगळुरूमध्ये राहावं अशी माझी इच्छा आहे. गेली २७ वर्ष मी माझ्या कुटुंबापासून दूर आहे. मला आईची फार आठवण येते. मला पुन्हा विशाखापट्टणमला जायचं नाहीये. आईचा मोबाइल नंबर तरी मिळावा अशी माझी अपेक्षा आहे.’

संगीत हा ऐश्वर्याचाच मुलगा आहे हे सिद्ध करणारा एकही पुरावा त्याच्याकडे नाही. याबद्दल खुलासा देताना तो म्हणाला की, ‘माझ्या नातेवाईकांनी सगळे कागदपत्र नष्ट केले. लहानपणी मला या गोष्टींचे योग्य ज्ञान नसल्यामुळे नक्की काय करायला हवे हे मला काहीच माहित नव्हते. पण आता मला सारं काही स्पष्ट झालं आहे. आई अभिषेकपासून दूर झाली असल्यामुळे तिने माझ्यासोबत राहावे एवढीच माझी इच्छा आहे.’

गेल्या अनेक वर्षांपासून धनुषचे पालक कोण यावर न्यायालयात खटला सुरू असताना आता ऐश्वर्याचे नवे प्रकरण किती पुढे जाईल हेच कळत नाही.

Story img Loader