विश्व सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. फक्त तिच्या सौंदर्याचे नाही तर अभिनयाचे लाखो चाहते आहेत. ऐश्वर्याने आता पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त ऐश्वर्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, एकदा कॅनेडियन कॉमेडियन रसेल पीटर्सने ऐश्वर्यांच्या अभिनयावर टीका केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘स्पीडी सिंह’ हा इंडो-कॅनेडियन चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, रसेलने बॉलिवूड चित्रपटांबद्दल आपले मत व्यक्त केले होते. ‘मला बॉलिवूड आवडत नाही. त्यांचे चित्रपट हे कचऱ्यासारखे असतात. लाखो लोकांना बॉलिवूड चित्रपट आवडतात पण मला या चित्रपटांमध्ये असलेला डान्स, गाणी आणि रडण्याची सीन आवडत नाही. मी आता पर्यंत बॉलिवूड चित्रपट पाहिला नाही. मी कधीच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणार नाही. पण मला आशा आहे की काही चित्रपट निर्माते चांगले आणि वास्तविकता दाखवण्याचा प्रयत्न करतील’, असे रसेल म्हणाला.

एवढंच नाही तर पुढे बॉलिवूड चित्रपटांवर टीका करत रसेलने ऐश्वर्यावर विनोद केला आणि म्हणाला, ‘ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमध्ये असलेला वाईट अभिनयाचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. सुंदर चेहरा असेल तर लोक बॉलिवूडमध्ये सुपरस्टार बनू शकतात हे ते नेहमीच सिद्ध करतात.’

आणखी वाचा : ‘याला म्हणतात संस्कार’, बिग बींची नात आराध्याचा डान्सनंतर भजन गातानाचा व्हिडीओ झाला व्हायरल

ऐश्वर्यावर रसेलने केलेल्या या टीकेवरून त्यावेळी बराच गोंधळ झाला होता. रसेलला माफी मागण्यास सांगण्यात आले होते, पण त्याने माफी मागितली नाही. रसेलच्या या टीकेमुळे सुरु झालेला वाद पाहता ‘स्पीडी सिंह’ चित्रपटाचे निर्माते अजय विरमानी यांनी माफी मागितली होती. या चित्रपटात रसेलसोबत अक्षय कुमार आणि अजय विरमानी यांचा मुलगा विनय विरमानी होते.

आणखी वाचा : “मी पॅन्टवर अंडरवेअर परिधान केली तेव्हा मला…” प्रियांका चोप्राचं ‘त्या’ प्रश्नावर मजेशीर उत्तर

दरम्यान, ऐश्वर्या गेल्या काही काळापासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. लवकर ऐश्वर्या मणि रत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियन सेलवन’ या चित्रपटात दिसणार आहे. या आधी ऐश्वर्या ‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘फॅनी खान’ या चित्रपटांमध्ये दिसली होती. ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.