प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपट गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची मुख्य भूमिका आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. ‘पोन्नियन सेल्वन’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि अप्रतिम व्हीएफएक्सचं मिश्रण पाहायला मिळालं. आता हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

आणखी वाचा – ‘ब्रह्मास्त्र’ला मिळत असलेल्या यशाबाबत कंगना रणौतचं टिकास्त्र, म्हणाली “बॉक्सऑफिस कलेक्शनचे आकडे खोटे अन्…”

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Amiatbh Bachchan And Rekha
रेखा यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सुहाग’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या, “ज्यांच्याबरोबर मी…”
Aishwarya Rai Abhishek Bachchan
“ऐश्वर्या-अभिषेक बच्चनचा स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध…”, ‘कुछ ना कहो’फेम अभिनेत्रीचा खुलासा
Actor and TVK President Vijay on Dr BR Ambedkar
Actor Vijay on Ambedkar: “आंबेडकरांचीही मान आज शरमेने खाली झुकली असती…”, तमिळ अभिनेता विजयचं मोठं विधान
rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल

५०० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटामधील ऐश्वर्याचा लूक पाहून प्रेक्षक भारावून गेले. इतकंच नव्हे तर चित्रपटाचा टीझर पाहून सिनेरसिकांना ‘बाहुबली’ चित्रपटाची आठवण झाली. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होईल. ‘पोन्नियन सेल्वन’चा पहिला भाग ३० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. पण त्याचपूर्वी या चित्रपटाने एक नवा विक्रम रचला आहे.

आजतकच्या वृत्तानुसार, ‘पोन्नियन सेल्वन’चे ओटीटी राइट्स जवळपास १२५ कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने या चित्रपटाचे ओटीटी राइट्स खरेदी केले आहेत. म्हणजेच या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी १२५ कोटी रुपयांची कमाई केली असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे दोन्ही भाग अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने खरेदी केली असल्याचीही चर्चा आहे.

आणखी वाचा – Video : ‘देवमाणूस ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार? किरण गायकवाडच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

या चित्रपटाची कथा ही १० व्या शतकात दक्षिण भारतावर राज्य करणाऱ्या चोळ साम्राज्याची शक्ती आणि संघर्ष यावर आधारित आहे. ‘पोन्नियन सेल्वन’च्या टीझरनंतर व्हीएफएक्स इफेक्टबरोबर स्टारकास्टबाबतही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जवळपास सर्वच कलाकारांचे लूक समोर आले आहेत. ऐश्वर्या राय बच्चनसह विक्रम, कार्ति, जयम रवि, प्रकाश राज, नस्सर, शोभिता धूलिपाला, प्रभु आणि किशोर या सर्वच कलाकारांचे लूक सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Story img Loader