१९९४मध्ये ऐश्वर्या राय बच्चनने मिस वर्ल्डचा किताब पटकावला. त्यानंतर तिने मागे कधीच वळून पाहिलं नाही. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. आपल्या कामाच्या जोरावर ती आज सातासमुद्रापलिकडे पोहोचली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? मिस वर्ल्डचा किताब पटकावण्यापूर्वी ऐश्वर्या प्रसिद्धीच्या झोतात आली. एका जाहिरातीमुळे रातोरात तिचं नशिब बदललं. तिच्या याच जाहिरातीचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – “अजूनही खूप लोकांना माहीत नाही की…” पंकज त्रिपाठींनी सिद्धार्थ शुक्लाबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत

१९९३मध्ये कोल्ड ड्रिंकची एक जाहिरात प्रदर्शित झाली. या जाहिरातीमध्ये ऐश्वर्यासह आमिर खान, महिमा चौधरीने काम केलं. सौंदर्यवती म्हणून किताब पटकण्यापूर्वीच या एका जाहिरातीमुळे ऐश्वर्याच्या नावाची सगळीकडेच चर्चा सुरु झाली. या जाहिरातीमध्ये ऐश्वर्याचा लूक पाहून सारेच जण थक्क झाले. तसेच तिच्या मोहक सौंदर्याची प्रत्येकाला भूरळ पडली.

एका कोल्ड ड्रिंकच्या जाहिरातीमुळे ऐश्वर्याचं नशिब उजळलं. या जाहिरातीमध्ये तिची काही सेकंदांसाठीच झलक पाहायला मिळाली. ऐश्वर्याला बऱ्याच जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण या एका जाहिरातीमुळे ती अधिक नावारुपाला आली. सध्या या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – ऐश्वर्या रायच्या ‘पोन्नियन सेल्वन’ने प्रदर्शनापूर्वीच कमावले १२५ कोटी, ‘ब्रम्हास्त्र’लाही टाकणार मागे?

सध्या ऐश्वर्या प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये ती मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसेल. या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित होणार आहेत. चित्रपटाचा पहिला भाग ३० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.