aishwaryaraibachchanबॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ६८ व्या कान चित्रपट महोत्सवात सहभागी झाली असून, जगप्रसिद्ध कॉस्मेटिक ब्रॅण्ड लॉरिअलचा चेहरा असलेल्या ऐश्वर्याने टि्वटरवर छायाचित्र आणि व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर चाहत्यांच्या कमेंट्नादेखील प्रतिक्रिया दिली आहे. आई वृंदाला ऐश्वर्या आपल्या आयुष्यातील प्रेरणा मानते. या छोट्याशा व्हिडिओमध्ये ती आईबाबतच्या भावना प्रकट करताना दिसते. त्याचप्रमाणे आराध्या या तिच्या तीन वर्षाच्या मुलीविषयीदेखील व्हिडिओमध्ये बोलताना दिसते.

aishwarya0-aaradhya-aishmomआराध्यादेखील आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत तिच्याकडे पाहून आपल्याला जिवनातील बालसुलभपणा आणि उर्जेची जाणीव होत असल्याची भावना ती व्यक्त करते. ऐश्वर्याने हा व्हिडिओ टि्वटरवर शेअर केला आहे. एका चाहत्याच्या विनंतीस मान देऊन आराध्या बरोबरचे अविस्मणीय क्षण कथन करताना ती म्हणते, आराध्याबरोबरचा प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी अविस्मणीय आणि खास आहे. माझ्या आयुष्यातील तिच्या आगमनासाठी मी देवाचे आभार मानते. तिच्यामुळे मला निखळ प्रेमाची जाणीव झाल्याचे ऐश्वर्या पाणावलेल्या डोळ्यांनी सांगते.

सहा महिन्याची असल्यापासून आईबरोबर कान महोत्सवात हजेरी लावत असलेल्या आराध्याच्या कान चित्रपट महोत्सवातील उपस्थितीबाबत बोलताना ऐश्वर्या सांगते की, कान चित्रपट महोत्सवाच्या ठिकाणी लहान मुलांसाठी असलेल्या प्ले एरियामध्ये मी तिला घेऊन जाते. कानमधील हे माझे १४ वे वर्ष असून, आराध्याच्या अगोदर मी कधी या प्ले एरियामध्ये आल्याचे मला आठवत नाही. परंतु गेल्या तीन वर्षापासून आराध्याबरोबर मी या ठिकाणी येते. लहान मुलांना येथे खेळताना पाहून मन प्रफुल्लित होते आणि हा अनुभव अविस्मणीय असल्याचे ऐश्वर्या सांगते.

aishwaryaaaradhya2
ऐश्वर्याने पोस्ट केलेले आराध्याबरोबरचे हे छायाचित्र इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. कानच्या रेडकार्पेटवर अवतरण्यासाठी सज्ज झालेल्या आपल्या आईचे सौंदर्य कौतुकाने न्याहाळताना आराध्या छायाचित्रात दिसत आहे.

Story img Loader