अभिनेत्री ऐश्वर्या रायने आजवर बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय. कायम नाविन्यपूर्ण भूमिका साकारत तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. लवकरच ती एका नव्या भूमिकेत झळकणार आहे. मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेलवन सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. यात ऐश्वर्या एका राणीच्या वेशभूषेत दिसून यतेय. या सिनेमातून ती जवळपास चार वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

मणिरत्नम यांच्या मदरास टॉकिज या ट्विटर अकाऊंटवरून ऐश्वर्याचं पोस्टर शेअर करण्यात आलंय. या सिनेमात ऐश्वर्या नंदिनी ही भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसतेय. तिने सिल्कची साडी परिधान केलीय. हेवी ज्वेलरी आणि मोकळ्या केसामध्ये तिचं सौदर्य खुलून आलंय. या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, “सूडामागचा सुंदर चेहरा, भेटा पझुवूरच्या राणीला.”

ऐश्वर्याचं हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून सिनेमातील ऐश्वर्याच्या लूकचा चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय. एका वृत्तानुसार या सिनेमात ऐश्वर्या राय डबल रोलमध्ये पाहायला मिळणार आहे. यापूर्वी देखील पोन्नियिन सेलवन सिनेमातील ऐश्वर्याचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. दोन्ही पोस्टरमध्ये ऐश्वर्याचे लूक वेगवेगळे दिसत आहेत. सिनेमातील विक्रम आणि कार्थीचे लूकही पूर्वीच रिलीज करण्यात आले आहेत.

30 सप्टेंबरला पोन्नियिन सेलवन या सिनेमाचा पहिला भाग सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, मळ्यालम आणि तेलगू भाषेत रिलिज होणार आहे. या मल्टीस्टारर सिनेमामध्ये विक्रम बाबू, शोभिता धूलिपाला, प्रकाश राज, रवि, तृषा आणि शरद कुमार हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

कल्कि कृष्णामूर्ती यांच्या १९५५ साली आलेल्या पोन्नियिन सेलवन या कादंबरीवर आधारित या सिनेमाची कथा आहे. सिनेमाचं बजेट जवळपास ५०० कोटी असल्याचं म्हंटलं जातंय.

Story img Loader