बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्व सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. हे फोटो पाहिल्यानंतर ऐश्वर्या गर्भवती आहे अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.
बऱ्याचवेळी सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांवर ऐश्वर्या आणि पती अभिषेक बच्चन उत्तर देतात. मात्र, यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांनीही उत्तर दिलेलं नाही. एवढं असलं तरी त्यांच्या काही चाहत्यांना जाणून घ्यायच होते की खरंच ऐश्वर्या गर्भवती आहे का? यासोबतच वयाच्या ४७ व्या वर्षी ती गरोदर होऊ शकते का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता.
आणखी वाचा : गर्भवती असताना सैफसोबतच्या ‘सेक्स लाइफ’विषयी करीना कपूरने केलं होतं भाष्य म्हणाली…
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या वयात गरोदरपण धोकादायक असल्याचं म्हटलं जातं. कारण तो पर्यंत एका महिलेचे शरीर थकून जाते. वयाच्या ४५ व्या वर्षी फार कमी स्त्रीया नैसर्गिकरित्या गर्भवती होऊ शकतात. या वयात फर्टिलिटी ट्रिटमेंटच्या माध्यमातून अनेक स्त्रीया आई होण्याचं सुख मिळवतात.
३० व्या वर्षी आई होण्यामध्ये आणि ४५ व्या वर्षी आई होण्यामध्ये खूप मोठा फरक आहे. वाढत्या वयानुसार आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या उद्भवू शकतात. ४५ व्या वर्षी किंवा त्यानंतर गरोदरपण असेल तर जेस्टेशनल डायबिटीज, उच्च रक्तदाब, प्लेसेंटामध्ये अडचणी, सिजेरियन डिलीवरी, एक्टोपिक प्रेग्नेंसी, मिसकॅरेज आरोग्या संबंधीत अशा अनेक अडचणी उदभवू शकतात. वयाच्या ४५ व्या वर्षी एखादी स्त्री गर्भवती असेल तर त्यावेळी तिची जास्त काळजी घेतली पाहिजे.