रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय ऑलिम्पिक पथकाचा सदिच्छादूत म्हणून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने चित्रपट अभिनेता सलमान खानची निवड केल्यानंतर देशभरात वादंग माजला आहे. सलमानच्या निवडीला विरोध होत असतानाच अनेक बॉलीवूडकर त्याच्या समर्थनासाठीही पुढे येत आहेत. सलमानची पूर्वाश्रमीची प्रेयसी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही देखील सलमानच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा: सलमानच्या नियुक्तीमध्ये गैर काहीच नाही -गावस्कर

रिओ ऑलिम्पिकसाठीच्या सदिच्छादूत निवडीच्या वादाबाबत विचारले असता ऐश्वर्या म्हणाली की, जर एखादा व्यक्ती देशासाठी काहीतरी चांगले करत असेल आणि कुणाला देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा असेल, मग ते खेळ, संगीत असो किंवा कला, अशा व्यक्तींचे स्वागतच करायला हवे.

वाचा: वाद ही सलमानसाठी नवीन गोष्ट नाही- कतरिना कैफ

दरम्यान, या वादावर सलमानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अनेक बॉलीवूडकर सलमानच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. नुकतेच अभिनेत्री कतरिना कैफ हीने वाद ही सलमानसाठी काही नवीन गोष्ट नसल्याचे विधान केले. तर, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही सलमानच्या निवडीत काही गैर नसल्याचे म्हटले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan supports salman khan in rio olympics controversy