भारताची माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय मोठ्या पडद्यावर पुर्नपदार्पण करणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. २०११ साली आराध्याचा जन्म झाल्यापासून ऐश्वर्या तिची आईपणाची कर्तव्य निभवण्यात एकनिष्ठ झाली असून, काही कार्यक्रमात आणि जाहिरातींमध्ये ती झळकली आहे. पण, आता ती पुन्हा रुपेरी पडद्यावर येण्याच्या विचारात असल्याचे कळते.
अऩेक अनुमानांनंतर ऐश्वर्या मणीरत्नमच्या चित्रपटातून पुनपदार्पण करणार असल्याच कळते. यामध्ये तेलगु सुपरस्टार महेश बाबू आणि नागार्जून यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. कमल हसनची मुलगी श्रुती हसनदेखील या चित्रपटात मुख्य भूमिका दिसेल. एका प्रादेशिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मणीरत्नम यांच्या पत्नीने या बातमीस दुजोरा दिला असून, या चित्रपटाचे चित्रीकरण जूनपासून सुरु होणार असल्याचे सांगितले. हॉलीवूड चित्रपट ‘बॉर्न आयडेन्टिटी’ आणि ‘मिशन इमपॉसिबल’ यांप्रमाणेच हा चित्रपट गुप्तहेरांवर आधारित असा रोमांचक चित्रपट असणार आहे.

Story img Loader