मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट १’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मंगळवारी चेन्नईमध्ये मोठ्या उत्साहात ट्रेलर प्रदर्शित झाला. या कार्यक्रमात कमल हसन देखील प्रमुख पाहुणे म्हणून पोहोचले होते, पण संध्याकाळचे सर्वात मोठे आकर्षण ठरले सुपरस्टार रजनीकांत. कार्यक्रमात जेव्हा ऐश्वर्या राय बच्चन आणि रजनीकांत एकमेकांसमोर आले तेव्हा ऐश्वर्याने असं काही केलं की सर्वांनी तिच्या कृतीवर टाळ्यांचा कडकडाट केला. रजनीकांत आणि ऐश्वर्याने ‘रोबोट’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या कार्यक्रमात ऐश्वर्या राय काळ्या रंगाच्या सलवार-कुर्ती आणि दुपट्ट्यात दिसली. रजनीकांत प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला आले तेव्हा ऐश्वर्या मागच्या रांगेत होती. मात्र रजनीकांतला पाहताच ती धावतच पुढे आली. सर्वात आधी ‘पोनियान सेल्वन पार्ट 1’ चे दिग्दर्शक मणिरत्नम समोर आले, ज्यांना ऐश्वर्याने मिठी मारून स्वागत केले. यानंतर ती रजनीकांत यांच्याकडे सरकली आणि नतमस्तक होऊन रजनीकांतच्या पायाला स्पर्श केला. रजनीकांत यांनीही हसत हसत आशीर्वाद दिला.
आणखी वाचा- PS-1 Trailer : षडयंत्र, युद्ध अन् बलिदान… ऐश्वर्या रायच्या बहुप्रतिक्षीत PS-1 चा दमदार ट्रेलर पाहिलात का?

मणिरत्नम यांनी १९९७ मध्ये ‘इरुवर’ या सिनेमातून ऐश्वर्या रायला लॉन्च केलं होतं. यानंतर या जोडीने ‘रावण’ आणि ‘गुरू’ या चित्रपटातही एकत्र काम केलं होतं. कार्यक्रमात ऐश्वर्या रजनीकांत यांना वाकून नमस्कार करत असताना त्यांनी तिला थांबवले आणि मिठी मारून आशीर्वाद दिला. यानंतर दोघांनी एकमेकांना हात जोडून अभिवादन केले.

ऐश्वर्या रायने या कार्यक्रमादरम्यान मणिरत्नम यांचं ‘गुरू’ म्हणून वर्णन केले आणि ती म्हणाली, “मी त्यांच्याकडून उत्साह, कामाची बांधिलकी, समर्पण आणि एकाग्रता या गोष्टी शिकले आहे.” यावेळी तिने रजनीकांत आणि कमल हसन यांचेही आभार मानले आणि ती म्हणाली, “रजनी आणि कमल सर तुम्हा दोघांची इथे उपस्थिती असणं हे स्वप्नवत आहे. आम्ही सर्वजण तुमचे विद्यार्थी आणि चाहते आहोत आणि कायम राहू.”

आणखी वाचा- Video : “तुम्हाला कपड्यांवर कमेंट करायची…” फोटोग्राफर्सवर भडकली उर्फी जावेद

‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ चा ट्रेलर मोठ्या थाटात लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती राणी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती पझुवूरची राजकुमारी आहे. तसेच ती मंदाकिनी देवीच्या भूमिकेतही दिसणार आहे. या चित्रपटात चियान विक्रम आदित्य करिकलनच्या भूमिकेत आहे. याशिवाय वंथियाथेवनच्या भूमिकेत कार्थी, कुंदवईच्या भूमिकेत त्रिशा, अरुलमोळी वर्मनच्या भूमिकेत रवी आणि शोभिता धुलिपाला यांनी वनाथीची भूमिका साकारली आहे.

Story img Loader