बॉलिवूडचे दिग्ज अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांच संपूर्ण कुटुंब हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अमिताभ यांची नात आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. काही दिवसांपूर्वी आराध्याचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आराध्याचा हा व्हिडीओ बच्चन कुटूंबाच्या एका फॅनक्लबने शेअर केला आहे. या व्हिडीओत आराध्याने गुलाबी रंगाच्या ड्रस परिधान केला आहे. या व्हिडीओत आराध्या प्रभू श्री राम यांचे भजन गात आहे. आराध्याचा हा जूना व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ जूना असला तरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आराध्या आणि बच्चन कुटुंबाची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘तुमचे संपूर्ण कुटुंब नेहमीच भारतीय संस्कृतीचे पालण करत असल्याचे पाहायला मिळते. शेवटी हरिवंशराय बच्चनयांचे कुटुंब आहे.’

आणखी वाचा : प्रियांका-निकच्या लग्नाचा एकूण खर्च ३ कोटी रुपये, कोणी केला माहित आहे का?

आणखी वाचा : KBC 13: सौरव गांगुली आणि सेहवागला धोनीशी संबंधित ‘या’ प्रश्नाचे देता आली नाही उत्तर, घ्यावी लागली एक्सपर्टची मदत

या आधी आराध्याचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो तिचा डान्स व्हिडीओ होता. या व्हिडीओत आराध्या श्यामक दावर यांच्या एका शोमध्ये डान्स करताना दिसली होती. यात आराध्याने गुलाबी रंगाचा फ्रॉक परिधान केला आहे. आराध्या ही ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आहे. आराध्या ही त्यांच्या घरात सगळ्यात लाडकी आहे.

Story img Loader