बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकताच त्यांचा ७९ वा वाढदिवस साजरा केला. अमिताभ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ऐश्वर्याने आराध्यासोबतचा फोटो शेअर केला होता. अमिताभ हे आराध्यावर जिवापाड प्रेम करतात. ते बऱ्याचवेळा त्यांच्या नाती विषयी बोलताना दिसतात. आराध्याचा जन्म झाल्यानंतर ती पहिल्यांदा घरी आल्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर मीडियाची मुलाखत घेतली होती.

“आराध्या ही ऐश्वर्यासारखी दिसते असं मला वाटतं. घरातील काही सदस्य बोलतात की आराध्या ही अभिषेक आणि जयासारखी दिसते. मात्र, माझं हेच मत आहे की आराध्या ही ऐश्वर्यासारखी दिसते,” असे अमिताभ म्हणाले. पुढे त्यांनी ऐश्वर्याने जेव्हा आराध्याला जन्म दिला त्यावेळीची कहानी सांगितली होती. “१४ नोव्हेंबरच्या रात्री जेव्हा आम्ही रुग्णालयात गेलो. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की ऐश्वर्याची डिलिव्हरी आज करू शकतो, मात्र, १६ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. ऐश्वर्याची नॉर्मल डिलिव्हरी होती. जरी आज काल लोक सी-सेक्शनने डिलिव्हरी करतात, तरी ऐश्वर्याला नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे होती. तिला संघर्ष करावा लागला होता पण मी तिचे कौतुक करतो. तिने जवळपास २-३ तास तीव्र लेबरपेन सहन केलं. तरी देखील ऐश्वर्याने एपिड्यूरल किंवा पेनकिलर घेण्यास नकार दिला होता”, असे अमिताभ म्हणाले होते.

आणखी वाचा : “जरा दोन दिवस…”, ऋतुराजच्या सामन्या आधी नेटकऱ्यांनी सायलीला दिला सल्ला

आणखी वाचा : “जेव्हा माझ्या ११ वर्षाच्या मुलाचे निधन झाले तेव्हा शाहरूख…”, शेखर सुमनचे ट्वीट व्हायरल

२००७ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न झाले होते. तर २०११ मध्ये आराध्याचा जन्म झाला होता. अमिताभ सध्या कौन बनेगा करोडपती १३ चे सुत्रसंचालन करत आहेत. तर ऐश्वर्या मनिरत्नम सोबत ‘पोन्नियिन सेलवन’ या चित्रपटात दिसणार आहे. ऐश्वर्याने ‘पोन्नियिन सेलवन’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे.

Story img Loader