माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चनने कान चित्रपट महोत्सवात उपस्थितीत राहून आपल्या हजारो चाहत्यांना दर्शन दिले. अतिशय प्रतिष्ठेच्या या महोत्सवात ऐश्वर्या आपल्या लहानग्या ‘आराध्या’सह उपस्थित होती. ऐश्वर्याने परिधान केलेल्या सव्यसाची साडीमुळे तिचे रुप रेड कार्पेटवर अजूनच खुलून दिसत होते.
विद्या बालन आणि पूनम कपूर या भारतीय सुदरींच्या कोल्ड शोनंतर कानच्या रेड कार्पेटवर प्रेक्षक ऐश्वर्याची आतुरतेने वाट पाहात होते. भारतीय चित्रपटांच्या शतकाचे औचित्य साधून काळ्या रंगावर सोनेरी कशीदा केलेली लेहंगा साडी परिधान करून ऐश्वर्या प्रेक्षकांसमोर आली होती. त्या अगोदर भारतीय प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ऐश्वर्याने पांढ-या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचा मेरमेड पद्धतीचा स्कर्ट परिधान केला होता. कान महोत्सवाला उपस्थिती लावून ऐश्वर्याने प्रेक्षकांकडून १० पैकी १० गुण मिळवल्यात जमा आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Story img Loader