बॉलीवूडच्या तीन दिवा- ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ आणि सोनम कपूर या गुरुवारी एका पुरस्कार सोहळ्याकरिता एकत्र आल्या होत्या.
लॉरियल पॅरिस फेमिना वूमन अॅवॉर्डने विलक्षण गुणवत्ता असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराने १५ महिलांना सन्मानित करण्यात आले. यात उषा जाधवला (चित्रपट), किरण बेदी (सामाजिक परिणाम), राणी खनाम (संगीत आणि कला) आणि रझिया सुलताना (प्रशिक्षण) यांचा समावेश आहे. लॉरियलच्या पुरस्कार सोहळ्यात इषा शेरवानी, स्वानंद किरकिरे आणि आदिती मित्तल यांनी परफॉर्मन्स सादर केले.

Story img Loader