प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन या वर्षी पुन्हा एकदा कान चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर अवतरणार आहे. पण, यावेळी ती एकटीच नसेल. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वेळी रेड कार्पेटवर चालताना तिच्याबरोबर तिची १८ महिन्यांची चिमुकली आराध्या बच्चनही असणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
या वर्षीच्या कान चित्रपट महोत्सवासाठी आराध्या आपली आई ऐश्वर्या आणि आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाणार आहे. अमिताभ बच्चन त्यांचा पहिलाच हॉलिवूड चित्रपट ‘द ग्रेट गेटस्बे’साठी उपस्थित राहाणार आहेत.
आराध्या आपल्या आईसोबत पहिल्यांदाच कान महोत्सवाला जात नसून, मागील वर्षीही ती आई बरोबर कान महोत्सवाला गेली होती. बाळंतपणानंतर ऐश्वर्या रायची  रेड कार्पेटवरील ती पहिलीच सर्वात मोठी उपस्थिती होती.
‘लॉरेयल’ साठी ब्रॅन्ड अॅम्बेसेडर असलेली ऐश्वर्या राय कान चित्रपट महोत्सवासाठी नियमित उपस्थित असते. ती पहिली अशी भारतीय अभिनेत्री आहे जी २००३ सालच्या कान चित्रपट महोत्सवाच्या पंच समितीची सभासद होती.

Story img Loader