दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या या दोघांनी २००४ मध्ये कुटुंबीयांच्या संमतीने लग्नगाठ बांधली. या दोघांचा लग्न सोहळा दाक्षिणात्य कलाविश्वातील गाजलेल्या लग्नसोहळ्यांपैकी एक होता. मात्र, जवळपास १८ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर २०२२ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
धनुषबरोबर घटस्फोट घेतल्यावर ऐश्वर्या लवकरच दुसरे लग्न करणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. अनेकांनी तिला चेन्नईच्या रिसॉर्टमध्ये तरूण अभिनेत्याबरोबर पाहिले होते. परंतु, या सगळ्या चर्चा खोट्या असल्याचे समोर आले आहे. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या रजनीकांतच्या दुसऱ्या लग्नाबाबतच्या सगळ्या चर्चा खोट्या आहेत. ती सध्या तरी दुसरे लग्न करण्याचा विचार करत नाही.
हेही वाचा : “१२ वर्षांची मेहनत आणि जिद्द…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे हिंदी मालिकेत पदार्पण, शेअर केली खास पोस्ट
ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष यांनी जानेवारी २०२२ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून विभक्त झाल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. ऐश्वर्या अनेकदा तिची दोन्ही मुलं यात्रा आणि लिंगा यांच्याबरोबर वेळ घालवताना दिसते.
ऐश्वर्या रजनीकांत यात्रा आणि लिंगा यांच्यासह एप्रिलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सची आयपीएल मॅच पाहण्यासाठी गेली होती. त्या तिघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. दरम्यान, ऐश्वर्या सध्या वडिलांच्या आगामी ‘लाल सलाम’ चित्रपटासाठी विशेष मेहनत घेत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर मे महिन्यात प्रदर्शित करण्यात आले होते.