छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती १४’ हा शो दिवसेंदिवस मनोरंजक होत आहे. हा शो अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. पण बिग बींना करोनाची लागण झाल्याने केबीसीच्या शुटिंगचं पुढे काय होणार? त्यांच्या जागी नवीन कलाकार शो होस्ट करणार की बिग बी बरे झाल्यानंतर पुन्हा शुटिंग सुरू करणार, असे प्रश्न चाहते विचारत आहेत. दरम्यान, या शोमधील एका एपिसोडचा प्रोमो व्हायरल होत आहे. यात स्पर्धकाला २५ लाखांसाठी एक प्रश्न विचारण्यात आला, पण स्पर्धकाला त्याचं उत्तर देता आलं नाही.

हेही वाचा – ५० लाखांच्या ‘या’ प्रश्नाचं उत्तर येत नसल्याने तरुणानं सोडला केबीसी शो; तुम्हाला उत्तर माहितीये का?

पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य X/@Official_PIA)
Pakistan Airlines : पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of passengers
Mumbai-Prayagraj Flight Fare : महाकुंभमुळे विमान प्रवास १६२ टक्क्यांनी महागला, जाणून घ्या मुंबई-प्रयागराज विमानाचे तिकीट दर
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
kites on Makar Sankranti
मकरसंक्रांतीला पतंग उडवितांना कुठल्या दुर्घटना घडतात माहिती आहे का?
Gold, charas, ganja, Mumbai airport,
मुंबई विमानतळावर सोने, चरस, गांजा जप्त
Malad Mith Chowki flyover , traffic,
मुंबई : मालाड मीठ चौकी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा
mumbai sindhudurg air plane
मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा दोन महिने बंद

दररोज अनेक स्पर्धक हॉटसीटपर्यंत पोहोचतात. पण त्यापैकी काही जणांना सोप्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत आणि त्यांना खेळ सोडावा लागतो. असाच काहीसा प्रकार मंगळवारच्या एपिसोडमध्येही घडला, जेव्हा पेशाने डेंटिस्ट असलेली ऐश्वर्या रुपारेल हॉट सीटवर बसली होती. ऐश्वर्याने योग्य उत्तरं देत १२ लाख ४० हजारांपर्यंतचा गेम शानदार खेळला. पण त्यानंतर तिने २५ लाखांच्या प्रश्नावर खेळ सोडला. तो प्रश्न कोणता आहे, हे जाणून घेऊयात.

हेही वाचा – KBC मध्ये एक कोटी रुपयांसाठी स्पर्धकाला विचारण्यात आला ‘हा’ प्रश्न; तुम्हाला उत्तर माहितीये का?

यापैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव वैमानिकाच्या नावावर आहे? असा प्रश्न २५ लाखांसाठी विचारण्यात आला होता. त्यासाठी तिरुवनंतपुरम, जोधपूर, भुवनेश्वर आणि गुवाहाटी असे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचं उत्तर न आल्याने ऐश्वर्याने खेळ सोडला. या प्रश्नाचं बरोबर उत्तर भुवनेश्वर आहे.

हेही वाचा – VIDEO: ‘लग्नाला उशीर का करतीयेस?’ अमिताभ यांनी विचारलेल्या या प्रश्नावर स्पर्धक ऐश्वर्याने दिलं मजेशीर उत्तर

यापूर्वी रामायणाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर उत्तर माहित नसल्याने एका स्पर्धकाला शो सोडावा लागला होता. “खालीलपैकी कोणते वाल्मिकी रामायणातील कांडाचे नाव नाही?” असा तो प्रश्न होता. याच्या उत्तरासाठी सुंदर कांड, वनवास कांड, युद्ध कांड आणि किष्किन्धा कांड हे चार पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचं उत्तर वनवास कांड होतं. पण हे उत्तर ऋचाला माहित नव्हतं, त्यामुळे तिने ६ लाख ४० हजारांची रक्कम घेत शो सोडण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader